Share

पुण्यातील कबड्डीपटू मुलीच्या हत्या प्रकरणाचे कारण आले समोर

Published On: 

पुणे :  बिबवेवाडी परिसरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घुण पद्धतीने हत्या केल्याप्रकरणी सर्वत्र संतापजनक भावना उमटत आहे. पीडित मुलगी नियमितपणे कब्बडीचा सराव करण्यासाठी संध्याकाळी येथे आली होती. त्याच वेळी तिथे आलेल्या तीन नराधम तरुणांनी तिच्यावर कोयत्याने वार केला. सध्या या धक्कादायक घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी घटनास्थळाला भेट देत सर्व माहिती घेतली. १२ तासांच्या आत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत मुख्य आरोपीसह इतर दोघांना अटक करण्यात आली आहे. ज्या व्यक्तीने मुलीचा खून केला त्याच्याकडे कोयता तसेच पिस्तुलदेखील होते. आरोपी तरुण हा अल्पवयीन मुलीचा नातेवाईक असून तिच्या घरी राहत होता. या प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करणार, असं पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं. पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स परिसरात आरोपी लपुन बसला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण? 

पिडीत मुलगी मुलगी इयत्ता आठवीत शिकत होती. हत्या करणारा आरोपी हा मृत मुलीचा नातेवाईक होता. आरोपीसोबत अन्य दोन व्यक्ती होत्या. मुलगी बिबवेवाडी परिसरात कबड्डीचा सराव करत होती. यावेळी मुख्य आऱोपी आणि इतर दोघे तिच्याजवळ आले. यातील एकाने तिच्यावर कोयत्याने अचानकपणे वार करायला सुरुवात केली. थेट मानेवर वार झाल्यामुळे काही समजायच्या आत मुलगी जमिनीवर कोसळली. त्यानंतर आरोपीने फक्त मानेवरच आणखी वार केले. आरोपीने अत्यंत अमानुषपणे मुलीचा खून केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!