Share

अपमानाचे उत्तर कोल्हापूरकर दिल्याशिवाय राहणार नाहीत – हसन मुश्रीफ

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :  ‘ विधानसभा निवडणुकीनंतर कोल्हापूरकरांचा केलेला अपमान आणि एक लाख साड्या वाटप’ या दोन गोष्टी ‘भाजप’चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पाठ सोडणार नाहीत, असा इशारा देत या अपमानाचे उत्तर कोल्हापूरकर दिल्याशिवाय राहणार नाहीत, असे स्पष्टीकरण आमदार हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. कागलचे नवनिर्वाचित आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी (ता. १) एक वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले.

मुश्रीफ म्हणाले, विधानसभेच्या निकालानंतर चंद्रकांत पाटील यांनी ‘आमचं काय चुकलं’ अशी कोल्हापूरकरांना विचारणा केली. एवढेच नव्हे, तर कोल्हापूरकरांना अपमानास्पद वागणूक दिली, त्याबद्दल कोणीतरी बोलणे गरजेचे होते. कोल्हापूरकरांचा केलेला अपमान व एक लाख साड्या वाटप या दोन गोष्टी पाटील यांच्या मागे आयुष्यभर लागणार आहेत. त्यांना लोकांची नस माहीत नाही, लोकशाहीमध्ये आंदोलन, मोर्चे काढण्याचा सर्वांना अधिकार आहे, ते त्यांना आवडत नाही.” असे म्हणत मुश्रीफ पाटील यांच्यावर निशाणा साधला.

त्याचप्रमाणे ‘गोकुळ’च्या मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे सातशे ठराव सत्तारूढ गटाला दिल्याने सत्ता राखली. मात्र त्यानंतर त्यांना कोलाहापूरकरांची आमची किंमत कळली नाही. आता एका विशिष्ट वळणावर पी. एन. पाटील यांच्यासह आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत. मल्टिस्टेटबाबत आपण त्यांच्याशी बोललो होतो, हे खरे आहे. आगामी निवडणुकीबाबतही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. असेही ते त्यावेळी म्हणाले. त्यातच ‘भाजप’ने कुपेकर घराण्याला दुय्यम स्थान देत डावलले आहे. संध्यादेवी कुपेकर किंवा नंदिनी बाभूळकर यापैकी कोणीही उभे राहावे, अशी आमची इच्छा होती. आम्ही शेवटपर्यंत त्यांची वाट पाहिल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1190264779467677696?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1190267985685909506?s=20

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!