कोल्हापूर : सध्या महिला अत्याचारांच्या घटनांमुळे महाराष्ट्र हादरला आहे. अशातच काँग्रेस आमदाराच्या सुनेने सासऱ्यांसह, पती व नणंद यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. अदिती राजेश पाटील यांनी कराड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी आपल्या फिर्यादीत शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
त्यानुसार काँग्रेस आमदार पांडुरंग निवृत्ती उर्फ पी एन पाटील, त्यांचे पुत्र राजेश पाटील आणि कन्या टीना महेश पाटील यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तक्रारदार आदिती पाटील या राष्ट्रवादीचे नेते आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची पुतणी आहे. त्यांच्या या आरोपांमुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सुनेच्या आरोपांना आमदार पाटील यांनी धुडकावून लावलं आहे. ‘आम्ही कुठल्याही प्रकारे सुनेचा छळ केलेला नाही. लग्न झाल्यापासून ती बहुतांशी काळ माहेरीच असते. त्यामुळे तिचा छळ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी राजकारणात आहे. सुनेकडे एक कोटी रुपये मागण्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. खोट्या आरोपांमुळे मनाला क्लेश होत आहे,’ असं पाटील म्हणाले.
सुनेचा काय आरोप ?
पोलिसांनी सांगितले की, दोन वर्षापूर्वी पी.एन. पाटील यांचा मुलगा राजेश व अदिती यांचा मोठ्या थाटामाटात कोल्हापुरात विवाह संपन्न झाला. लग्नानंतर आपला सासरी छळ करतानाच एक कोटीची मागणी केल्याचे अदिती यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सासरे पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी एन. पाटील, पती राजेश पांडुरंग पाटील व नणंद टीना महेश पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- बेळगावच्या नवनिर्वाचित नगरसेवक रवी साळुंखे राज ठाकरेंची घेतली भेट
- पत्रव्यवहार करूनही प्रश्न सुटत नसल्याने चक्क वाहतूक पोलिसांनीच रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले
- किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रू नुकसानीची दावा ठोकणार; मुश्रीफांचा आक्रमक पवित्रा
- सोमय्यांना चंद्रकांत पाटलांनी माहिती दिली मग त्यांनी माझ्यावर आरोप केले-हसन मुश्रीफ
- स्विस बँक केंद्र सरकारला देणार भारतातील काळा पैसा खातेधारकांची तिसरी यादी

