टीम महाराष्ट्र देशा : युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे आज आपला २९ वा वाढदिवस साजरा करत आहेत, शिवसैनिकांकडून आपल्या नेत्याला शुभेच्छा देण्याची चढाओढ लागली आहे, तर दुसरीकडे शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी सर्व नेत्यांना मातोश्रीवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिंदे यांच्याकडून सर्व आमदारांनाही निरोप देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे वाढदिवसाचे औचित्य साधत आदित्य यांना सर्व शिवसेना नेते, आमदारांकडून एकमुखाने निवडणूक लढण्याची मागणी होऊ शकते. एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्वाना बोलावणे आल्याने आदित्य यांची मनधरणी केली जाण्याची शक्यता वाढली आहे.
आगमी विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा युतीची सत्ता आल्यास आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जाहीरपणे याबाबत वक्तव्यही केले आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे हे निवडणूक लढण्यास तयार झाल्यास ते वरळी, माहिम अथवा शिवडीमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

