मुंबई : भारतीय क्रिकेटर हरभजन सिंग याने सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले आहे. यात पोस्टरमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार अर्जुन याच्यासोबत स्वत: हरभजनही दिसत आहे. हरभजन लवकरच चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे. त्याच्या पहिल्या डेब्यू चित्रपटाचे हे पोस्टर आहे.
१७० कामगारांना घरी जाण्यसाठी सोनूने केली खास चार्टर्ड विमानाची सोय
हरभजन सिंगने नुकताच सोशल मीडियावर तो भूमिका करत असलेल्या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. तमिळ भाषेत असलेल्या ‘फ्रेंडशिप’ नावाच्या चित्रपटात तो आपले नशीब आजमावत आहे. हा चित्रपट ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. तसेच हिंदी आणि पंजाबी भाषेत देखील या चित्रपटाचे डबिंग करून ‘रिलीज’ करण्यात येणार आहे.
Congratulations on your debut @harbhajan_singh. Never thought I will get to say this but a true star knows how and when to reinvent himself.#FriendshipFirstLook
???????? pic.twitter.com/bPc8EWFvBo— Syed Zeeshan Quadri (@onlyzeishan) June 5, 2020
जॉन पॉल राज आणि श्याम सूर्या हे दिग्दर्शित करीत असलेल्या या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता अर्जुन देखील भूमिका करत आहे. या चित्रपटात हरभजन सिंगची काय भूमिका आहे हे अद्याप कळू शकले नाही. पण पोस्टरवर त्याचे चित्र असल्याने कदाचित त्याला देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका मिळाली असावी असा अंदाज बांधला जात आहे.


