🕒 1 min read
मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयची १६ सदस्यांची टीम सुशांत सिंग राजपूत प्रकरणाच्या तपासात आता गुंतली आहे. मुंबई पोलिसांनी देखील सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयकडे सर्व कागदपत्रे हस्तांतरित केले आहेत. तसेच, सुशांतचा लॅपटॉप, मोबाईल आणि डायरीही सीबीआयने ताब्यात घेतली आहे. त्यामुळे आता सीबीआय हे प्रकरण किती दिवसात निकाली काढणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
सीबीआयने मुंबईमध्ये येताच सुशांतच्या घराची, कागदपत्रांची तसेच त्याच्या शवविच्छेदन अहवालाची तपासणी केली आहे. तसेच, सुशांतचे शवविच्छेदन करणाऱ्या कूपर रुग्णालयातील डॉक्टरांची देखील चौकशी केली जाऊ शकते असे समजते. या पोस्टमॉर्टम अहवालाचा तपास करण्यासाठी सीबीआयने फॉरेन्सिक एक्सपर्टसची नियुक्ती केली आहे.
पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटणार; पवना धरणाच्यासाठ्यात तब्बल ‘एवढा’ पाणीसाठा
सुशांतच्या या रिपोर्ट बाबत नियुक्त केलेल्या फॉरेन्सिक एक्सपर्ट आणि AIIMSचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी शंका उपस्थित केली आहे. या पोस्टमॉर्टमवर टाईम स्टॅम्प नसल्याचे त्यांनी आजतक या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. पोलिसांनी देखील याबाबत डॉक्टरांना विचारणे आवश्यक होते असे ते म्हणाले. मात्र, पोलिसांनी हि महत्वाची विचारणा वेळीच केली नाही, अशी प्रतिक्रिया देखील डॉ. सुधीर गुप्ता यांनी दिली आहे. या अहवालाचा संपूर्ण तपास करण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागेल असे देखील यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
शिर्डीच साई मंदिर चालू करा, अन्यथा कोर्टात जाणार: खासदार सुजय विखे पाटील आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

