Share

शेतीव्यवसाय आणि शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी केंद्र सरकार काही करणार आहे का ? – सुप्रिया सुळे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला. राज्यातील शेतीव्यवसाय आणि शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी केंद्र सरकार काही करणार आहे का ? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, दुष्काळ आणि कर्जाने कंटाळून बळीराजा आत्महत्या करत आहेत. याचदरम्यान शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला. शेती हा राज्यांच्या अखत्यारीतील विषय आहे याची मला जाणीव आहे, परंतु तरीही केंद्रीय कृषीमंत्र्यांनी आपल्या उत्तरादरम्यान पाणी व बियाणांबाबत सरकार विशेष लक्ष घालत असल्याचे सांगत आहे, त्यामुळे मला त्यांना काही विचारायच आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले.

राज्यातील शेती आणि शेतकरी संकटात असताना, दररोज सरासरी आठ शेतकरी आत्महत्या करीत आहेत असे म्हणत, जर अशा बाबी उघड होत असतील तर माझ्या राज्यातील शेतीव्यवसाय आणि शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी केंद्र सरकार काही करणार आहे का ? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

इतकेच नव्हे तर मी ज्या राज्याचे प्रतिनिधीत्व करत आहे, त्या महाराष्ट्रात सध्या शेतीव्यवसाय खूप मोठ्या संकटातून जात आहे. अशा वेळी राज्याचे मंत्री विधीमंडळात जलसंधारणासाठीची महत्त्वाकांक्षी योजना असणाऱ्या ‘जलयुक्त शिवार’ मध्ये निधीचा गैरवापर झाल्याचे मान्य करीत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!