बीड : बीड जिल्ह्यात अतिरिक्त ऊस न गेल्याने २००७ मध्ये नानाभाऊ शिंदे या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. ही परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून शेतकऱ्यांवर लाच द्यायची वेळ येऊ नये यासाठी साखर कारखान्यांनी खबरदारी घ्यावी. यापुढे कारखान्यांनी जिल्ह्याबाहेरील ऊस आणण्याचा प्रयत्न केल्यास त्या गाड्या रस्त्यातच अडवणार असून यासाठी शेतकऱ्यांनीही सज्ज राहावे, असा इशारा शेतकरी नेते गंगाभीषण थावरे यांनी दिला.
वडवणी तालुक्यातील चिंचवण येथे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने ऊस परिषद घेण्यात आली. यावेळी थावरे म्हणाले की, उसाला ३ हजार ९०० एफआरपीप्रमाणे भाव मिळाला तरच शेतकऱ्यांना ऊस परवडतो. गतवर्षी जिल्ह्याबाहेरील नॅचरल शुगर कारखान्याने उसाला २ हजार ४०० तर गंगाखेड शुगर कारखान्याने २ हजार २६७ रुपये भाव दिला. मग जिल्ह्यातील कारखान्यांना असा भाव देणे का परवडत नाही? अपेक्षित भाव न देता कमीत कमी भाव देऊन आपल्याच कार्यक्षेत्रातील शेतकऱ्याला भरडले जाते.
कारखाना प्रशासन, ठेकेदार, शेतकरी, अधिकारी यांच्या संगनमताने गतवर्षी अतिरिक्त उसासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ८५ ते १०० कोटी रुपये (हेक्टरी १० हजार) लाच द्यावी लागली. याला वैतागून २००७ मध्ये नानाभाऊ शिंदे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. याला कारखान्यांचे प्रशासन जबाबदार आहे. कारखानदार बैठक घेऊन उसाला भाव ठरवतात मग शेतकऱ्यांनी आपल्याला काय भाव पाहिजे यासाठी एकत्र यावे, असे आवाहन थावरेंनी केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘किरीट सोमय्या हे तर भाजपचे शक्ती कपूर’, चंद्रकांत खैरेंचा टोला
- ‘दरेकर काहीच चुकीचे बोलले नाही, पुणे पोलिसांनी बावळटपणा केलाय’, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
- ‘महाराष्ट्र पोलिसांचे राजकीयकरण; पोलिसांनी त्यांचे उत्तम असलेले नाव जपले पाहिजे’
- मोठी बातमी! अजित पवारांकडून तत्काळ सैन्य भरतीबाबत प्रशासनाला निर्देश
- …तर राज्यसभेची निवडणूक बिनविरोध कशी करणार? फडणवीसांचा काँग्रेसला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

