पुणे : राज्यातील वीज बिलांची दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी भाजपाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आले होते. आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबरच शहराच्या विविध भागात कार्यकर्ते व नागरिकांनी आंदोलनाद्वारे वीज बिलांविरोधात जनक्षोभ व्यक्त केला. तसेच राज्य सरकारकडे संताप व्यक्त केला.
मनसेने राज्य सरकारला वाढीव वीजबिल माफ करण्यासाठी सोमवार प्रयंतचा अल्टिमेटम दिला होता. जर कोणताही निर्णय सरकारने घेतला नाही तर मनसे रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे. तर, मनसेच्या या आंदोलनाला भाजपचा देखील पाठींबा असून भाजप देखील आंदोलन करणार.
दरम्यान आज वाढीव वीज बिल विरोधात भाजपकडून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनाच भडका पाहायला मिळत आहे. भाजप कार्यकर्ते आज वीज बिलांची होळी करणार असून, पुण्यामध्ये होळी पेटवून आंदोलन सुरु केले आहे. पुण्यात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- वीजबिल मागणाऱ्या सरकारला अस्सल कोल्हापुरी तेल लावलेलं पायताण होतंय व्हायरल!
- पवारांवरील टीकेनंतर मिटकरींचा चंद्रकांतदादांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, ‘कोल्हापुरातील हाकलेल्यासाठी…’
- ‘शरद पवार अभ्यास नसलेले छोटे नेते’ : चंद्रकांत पाटील
- काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गोंधळानंतर उदय सामंतांची सारवासारव
- ‘सत्ता गेल्यापासून चंद्रकांत पाटील मतिमंद आणि मानसिक रुग्णासारखी वक्तव्य करत आहेत’


