Share

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गोंधळानंतर उदय सामंतांची सारवासारव

Published On: 

सोलापूर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ महाविकास आघडीची बैठक आज सोलापुरात पार पडली. महाविकास आघाडीच्या या बैठकीत सुशीलकुमार शिंदे समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. बैठकीत बॅनरवर माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो नसल्याने समर्थकांनी गोंधळ घातल्याचं समोर आलं आहे. यावरुन पुन्हा एकदा काँग्रेसमधील नाराजी नाट्य उघडकीस आलं.

सुशीलकुमार शिंदे समर्थकांच्या गोंधळानंतर राज्यमंत्री सतेज पाटील स्वत: खाली उतरले. काही काळ बैठकीत एकचं गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. सुशीलकुमार शिंदे समर्थकांनी जोरदार नारेबाजी करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यासमोर निषेध नोंदवला. इतकंच नाही तर, सोलापूरच्या विद्यमान आमदार व सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांचा देखील फोटो नसल्याने समर्थक अधिकच नाराज झाल्याचं दिसून आलं.

दरम्यान, यानंतर स्वत: राज्यमंत्री सतेज पाटील यांनी घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. त्यानंतर गोंधळ निवळला. उदय सामंत यांनी आपल्या भाषणात या प्रकाराबद्दल सारवासारव केल्याचं दिसून आलं. बैठकीत बॅनरवर सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो अनावधानाने राहिला असल्याचं उदय सामंत यांनी सागिंतलं. शिंदे साहेब आमच्या सर्वांच्या मनात असून, ज्या मग्रूरीने भाजप काम करत आहे त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी आम्ही तिघे एकत्रित असल्याचही उदय सामंत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!