Share

…या योजनांतर्गत केंद्राकडून राज्याला तब्बल १२ कोटी रुपये मिळतील- सुप्रिया सुळे

Published On: 

मुंबई: ‘जागतिक दिव्यांग दिनी’ राज्यातील दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी अनुदान मिळावे, यासाठी राज्य शासनातर्फे केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. गेली दोन वर्षे पडून असलेला हा प्रस्ताव पाठवावा यासाठी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)प्रयत्नशील होत्या. आता त्यांनी या पार्श्वभूमीवरच ट्वीट करत या योजनेबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

राज्यातील दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी अनुदान मिळावे, यासाठी राज्य शासनातर्फे केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात आला ही आनंदाची बाब आहे. यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता अखेर त्याला यश आले आहे. राज्य सरकारने काल पाठवलेल्या प्रस्तावामुळे दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांपैकी एडीप (ADIP), डीडीआरएस (DDRS) आणि सिपडा (SIPDA) या तीन योजनांतर्गत केंद्र शासनाकडून राज्य शासनाला तब्बल १२ कोटी रुपये मिळतील अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत दिली आहे.

दरम्यान या रकमेतून दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील २७ संस्थांना निधी उपलब्ध होऊन दिव्यांग पुनर्वसन आणि विकासाचे उपक्रम राबविणे सोपे होणार आहे. याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)आणि राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!