औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा मधील पदव्युत्तर विभागाचे अडमिशन सोमवारी सकाळी १० ते १ वाजे पर्यंत स्पॉट एडमिशन फेरी ठेवण्यात आली आहे.
विद्यापीठ परिसरात तसेच उस्मानाबाद परिसरात सर्व अभ्यासक्रमासाठी ही फेरी होणार असल्याची माहिती उपकुलसचिव डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली. २०२० – २१ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठातील परिसरातील सर्व ४५ विभाग आणि उस्मानाबाद मधील १० विभागांमधील १० विभागात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होणार आहे.
यंदा एम फिल प्रवेश ऑनलाईन झाली. पदव्युत्तर विभागात तासिका १५ फेब्रुवारी पासून ऑनलाईन तसेच ऑफ लाईन सुरू करण्यात एणार आहे. उपलब्ध असणाऱ्या प्रवेशित जागा, आरक्षण, फिस, पात्रता इतर सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. विज्ञान तंत्रज्ञान शखेसाठी विद्यापीठाच्या नाट्य गृहात ही प्रवेश प्रक्रिया होणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या सूत्रांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या


