Share

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाला 10 लाख अमेरिकन डॉलर्सचा पुरस्कार

Published On: 

सोलापूर : शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखले जाणारे ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार जाहीर झाले असून जगातील सर्वोत्तम 50 शिक्षकांची याकरिता निवड करण्यात आली आहे. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील रणजितसिंह डीसले यांचा समावेश आहे. लंडन येथील वाकी फाऊंडेशनच्यावतीने 10 लाख अमेरिकन डॉलर्सचा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मे महिन्यात लंडन येथे होणाऱ्या ग्लोबल एज्युकेशन अँड स्किल फोरम या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडीच्या शाळेत मागील 11 वर्षांपासून कार्यरत असणारे डिसले गुरुजी हे तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगांमुळे जगभर ओळखले जातात. डिसले गुरुजींनी तयार केलेली QR कोडेड पुस्तके आज 11 देशांतील 10 कोटींहून अधिक मुले वापरत आहेत.

व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप या आगळ्यावेगळ्या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून ते 150 हुन अधिक देशांतील शाळांमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करतात. अशा पद्धतीने अध्यापन करणारे ते जगातील 7 वे शिक्षक ठरले आहेत. मायक्रोसॉफ्ट, नॅशनल जिओग्राफीक सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थांनी रणजितसिंह डिसले यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

‘लेट्स क्रॉस द बॉर्डर’ या अभिनव शैक्षणिक प्रयोगाच्या माध्यमातून भारत, पाकिस्तान, इराक, इराण, इस्त्रायल, पॅलेस्टाईन, अमेरिका व उत्तर कोरिया या जगातील सर्वात अशांत देशांतील ५० हजार मुलांची पीस आर्मी तयार करून परस्पर सौहार्दाचे वातावरण करण्याच्या या शैक्षणिक प्रयोगाकरिता त्यांची निवड करण्यात आली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!