टीम महाराष्ट्र देशा : भाजी विकत घेताना भाव करताना झालेल्या वादात भाजी विक्रेत्याने ग्राहकाचा खून केल्याची खळबळजनक घटना दादर रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या मंडईत घडली. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. घटनेनंतर पसार झालेल्या भाजी विक्रेत्याला आज (मंगळवार) सकाळी अटक करण्यात आली.
Mumbai: A vegetable vendor allegedly stabbed a customer at vegetable market in Dadar yesterday, over an argument on cost of the vegetables. Police investigation underway pic.twitter.com/P8hCO9mS20
— ANI (@ANI) June 25, 2019
दादर स्टेशनबाहेर भाजी विक्रेता सोनीलाल आणि ग्राहक मोहम्मद हनीफ यांच्यात भाजी विकत घेण्यावरून वाद झाला. मामला होता, फक्त १० रुपयांचा. मात्र, दोघांत वाद वाढल्यानंतर भाजी विक्रेता सोनीलालने ग्राहक मोहम्मद हनीफवर हल्लाच केला.
भाजी विक्रेत्याने ग्राहकाच्या मानेवर आणि हातावर चाकूचे वार केले आणि हा हल्लेखोर भाजीविक्रेता पळून गेला होता. बेशुद्धावस्थेत असलेल्या हनीफ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.



