Share

राजू शेट्टींना धक्का; स्वाभिमानीचे पदाधिकारी रयतक्रांती संघटनेत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना मोठा धक्का बसला आहे. स्वाभिमानी संघटनेच्या तब्बल दीड डझन पदाधिकाऱ्यांनी रयत क्रांती संघटनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या ‘रयतक्रांती संघटने’मध्ये प्रवेश केला. यामध्ये राज्य कार्यकारिणीचे सदस्य, जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा संघटक, तालुका अध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष यांचा समावेश आहे. यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांने ‘स्वाभिमानीतील अंतर्गत दबाव, जातीयवाद अशा गोष्टींना कंटाळून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती संघटनेमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. यात जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा संघटक, तालुका अध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष तसेच सदस्यांचा समावेश आहे.

दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करत निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी पराभव केला होता. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला होता आणि आता पदाधिकाऱ्यांनी संघटना सोडल्याने शेट्टी यांना दुहेरी फटका बसला आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!