Share

लोकसभेसाठी शिरुरमधून आढळरावच, पक्षप्रमुखांचा उमेदवारीला ‘ग्रीन सिग्नल’

Published On: 

पुणे- लोकसभेसाठी शिरुरमधून शिवसेनेतर्फे चौथ्यांदा खासदार आढळरावच उमेदवार असणार हे आता निश्चित झाले आहे. शिरुर लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांचे काम कौतुकास्पद असल्याचं सांगत आढळराव यांच्या उमेदवारीला अनुकुलता दर्शविली आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील पदाधिका-यांशी संवाद साधण्यासाठी उध्दव ठाकरे आज (शनिवारी) पुणे दौ-यावर आहेत. पुणे जिल्हा, ग्रामीणअंतर्गत येणा-या लोकसभा, विधानसभा मतदार संघानिहाय ते आढावा घेत आहेत. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात या आढावा बैठका सुरु आहेत. सकाळी शिरुर लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यात आला.

दरम्यान, शिरुर मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव हेच असणार आहेत, हे आता निश्चित झाले आहे. आढळराव चौथ्यांदा लोकसभा लढविणार आहेत. त्यामुळे आता भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोण उमेदवार असेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

पंकज! ‘भुजबळ’ साहेबांच्या तब्येतीची काळजी घे- उद्धव ठाकरे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!