Share

लोकसभेवेळी पक्षाविरोधी काम करणाऱ्यांची शिवसेनेकडून उचलबांगडी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधात काम करणाऱ्या नेत्यांची शिवसेनेने उचलबांगडी केली आहे. शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवामुळे अनेक  नेत्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी पराभव केला. दरम्यान पक्षाविरोधात काम करणाऱ्या नेत्यांच्या विरोधात शिवसेनेने कारवाई सुरु केली असून अनेक नेत्यांची उचलबांगडी केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या आणि जुन्नरमधील पक्षाच्या नेत्या आशा बुचकेंच्या समर्थकांनी ‘मातोश्री’बाहेर गोंधळ घातला होता. त्यामुळे बुचके यांची पक्षातून हकालपट्टी केली. इतकेच नव्हे तर शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख राम गावडे यांची पदावरुन उचलबांगडी करत  त्यांच्या जागी जिल्हा परिषदचे सदस्य राम कटके यांची नियुक्ती केली.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!