रत्नागिरी : युतीचे सरकार असतांना कोंकणात नाणार रिफायनरी प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र शिवसेनेने विरोध केल्याने तो निर्णय रद्द करावा लागला. आता पुन्हा नाणारचा विषय चर्चेला येऊ लागला आहे. काही शिवसैनिकांनी नाणारला समर्थन दर्शविले आहे. या प्रकरणाची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांनीही नाणारचे समर्थन केले होते, त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
नाणार प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी १७ फेब्रुवारी शिवसेनेचे काही पदाधिकारी आणि शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. यात विभागप्रमुख राजा काजवे, जी.प.सदस्या मंदा शिवलकर यांच्यासह शिवसेनेचे इतरही पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
नाणार रिफायनरीची अधिसूचना रद्द होऊनही ‘सामना’त रिफायनरीची जाहिरात छापून आल्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली होती. ही कोंडी फोडण्यासाठी नाणार परिसरात शिवसेनेने सभा घेतली. शिवसेना आणि कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटना यांनी संयुक्तपणे सभा घेतली होती. या सभेला रिफायनरी विरोधी संघटनांचे प्रतिनिधीही हजर होते.याच सभेत खा. विनायक राऊत यांनी ही घोषणा केली आहे.
मागील काही दिवसांपासून अनेक शिवसेना पदाधिकारी नाणार रिफायनरीच्या समर्थनार्थ उघडउघड भूमिका घेताना दिसत आहेत. त्यामुळे विनायक राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत. जो कोणी प्रकल्पाला समर्थन करेल त्याला सक्त ताकीद दिली आहे.
रत्नागिरीतील जो शिवसैनिक नाणार रिफायनरीला समर्थन करेल त्याचं थोबाड फोडा, अशी ताकीद शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. आज नाणार प्रकल्पा विरोधातील जाहीर सभेत राऊत यांनी ही भूमिका मांडली आहे.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

