Share

कर्जमाफी आणि पीकविम्याचे पैसे न मिळाल्यास शेतकऱ्यांचा उद्रेक होईल – शिवसेना 

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: कागदपत्रांची कारणे देत शेतकऱ्यांना विमा नाकारला जात आहे. विमा अधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे कर्जमाफी आणि पीकविम्याचे पैसे न मिळाल्यास शेतकऱ्यांचा उद्रेक होईल, असा इशारा शिवसेना प्रतोद आ. सुनील प्रभू यांनी दिला आहे. विधिमंडळात अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी प्रभू बोलत होते.

अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची कारणे दिली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची अडवणूक होते. विमा अधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होईल, त्यामुळे लवकरात लवकर सर्व मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, अशी मागणी प्रभू यांनी केली आहे.

दरम्यान, राज्यामध्ये पाऊस पडत नसलेल्या भागात कृत्रिम पावसाबाबत सरकारने निर्णय घेतला असल्यास तो योग्य आहे. भविष्यात पिण्याच्या पाण्याची भयावह स्थिती निर्माण होऊ नये यासाठी सरकारने उपाययोजना करायला हव्यात असे ते म्हणाले.

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!