टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेत प्रवेश केलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे, विधानसभेतील शिवसेना आमदारांकडून मात्र क्षीरसागर यांना मंत्रीपद देण्यास विरोध होताना दिसत आहे. संघर्षाच्या काळामध्ये पक्षाशी एकनिष्ठ राहूनही बाहेरून आलेल्यांना मंत्रीपद दिल जाणार असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी स्थानिक आमदारांनी मेहनत घेतली आहे, आजवर या मतदारसंघांमध्ये पक्षाला कधीही यश मिळालेलं नव्हते, त्यामुळे पक्षाच्या दोन जागा वाढवण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या कोल्हापूर भागातील आमदाराची वर्णी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात लागण्याचा अंदाज होता. मात्र आता क्षीरसागर यांचे नाव पुढे आल्याने सेना आमदार नाराज झाले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांनी एकत्र बैठक घेत मातोश्री दरबारी आपले म्हणणे मांडले आहे. आमच्यातील कोणाही एकाला मंत्रीपद देण्यात यावे, मात्र बाहेरून आलेल्यांमुळे अन्याय होऊ नये, अशी भावना शिवसेना आमदारांनी व्यक्त केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

