Share

कट्टर विरोधक संभाजीराव काकडेंच्या निधनानंतर शरद पवारांनी व्यक्त केला शोक

Published On: 

पुणे : जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, सहकार तज्ज्ञ संभाजीराव काकडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. बारामती लोकसभा मतदारसंघातून संभाजीराव दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून काकडेंची ओळख होती. लाला या नावाने ते समर्थकांमध्ये ओळखले जात.

गेली अनेक वर्ष ते राजकीय घडामोडींपासून अलिप्त होते. महाराष्ट्राच्या राजकारणात ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जात होते. बारामती मतदारसंघातून ते दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते.

१९७८ व १९८२ मध्ये ते खासदार होते. १९७१मध्ये विधान परिषदेच्या माध्यमातून ते पहिल्यांदा आमदार झाले होते. जनता पक्ष आणि समाजवादी चळचळीच्या माध्यमातून त्यांनी काम केलं. पुणे जिल्ह्यातील आदिवासींसाठी त्यांनी हिरडा उत्पादक संघाची स्थापना केली होती. साखर कारखाना व तत्सम सहकार क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले होते.दरम्यान, खासदार शरद पवार यांनी काकडे यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. ‘

आपल्या शोकसंदेशात ते म्हणतात,माजी खासदार संभाजीराव काकडे यांच्या निधनानं बारामतीतील मातब्बर राजकीय व्यक्तित्व हरपले. जनता दलाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी राज्याच्या राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव टाकला. नव्या नेतृत्वाला दिशा देण्याचे कार्य निष्ठेनं केलं,’ अशा भावना शरद पवारांनी व्यक्त केल्या आहेत.

संभाजीराव काकडे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दु:ख व्यक्त केले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, संभाजीराव काकडे साहेब सामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी तळमळीनं कार्य करणारे नेते होते. शेतकरी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या उन्नतीसाठी त्यांनी जीवनभर काम केले. पुणे जिल्ह्याच्या विकासात मोलाचं योगदान दिलं. राजकारण, समाजकारण, सहकार अशा समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात कार्य करणारं ध्येयवादी, तत्वनिष्ठ नेतृत्वं म्हणून ते कायम स्मरणात राहतील.

संभाजीराव काकडे साहेब सार्वजनिक जीवनात ‘लाला’ नावाने परिचित होते. त्यांचं निधन ही पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे. जिल्ह्यानं ज्येष्ठ, मार्गदर्शक नेतृत्वं गमावलं आहे. मी, पवार कुटुंबिय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काकडे कुटुंबियांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दु:खात सहभागी आहोत. स्वर्गीय संभाजीराव काकडे साहेबांना सद्गती लाभो, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!