टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेच्या 40 जागावाटपांबाबतचा विषय संपला आहे. तर 8 जागांचा निर्णय दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बसून घ्यावेत. तर राहुल गांधीसोबत याविषयावर चर्चा झाली असून लवकरच यावर निर्णय घेतला जाईल. तसेच उमेदवार निवडून येणे महत्त्वाचे आहे मग तो राष्ट्रवादीचा असो अथवा काँग्रेसचा, पक्षाच्या ताकदी प्रमाणे निर्णय घ्या असा सल्लाही त्यांनी यावेळी महाराष्ट्रातील नेत्यांना शरद पवारांनी दिला. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
सध्या लोकांना बदल घडावा ही ईच्छा आहे. साडेचार वर्षात मोदींनी दिलेली आश्वासन पाळली नसल्याने जनता नाराज आहे. तर मोदी सरकार आता एक एक नवीन निर्णय घेत आहेत, पण जनतेला माहित आहे हा चुनावी जुमला आहे, असं पवार यांनी सांगितले.
सध्या देशात लोकसभा निवडणुकीच पडघम वाजू लागले आहेत. मोठ्या प्रमाणात भाजपा आणि काँग्रेसमध्ये लढत दिसणार आहे तर यासोबतच महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांमध्येही सध्या लोकसभेच्या जागांसाठी बैठका सुरु आहेत. मोदी सरकारला पाडण्यासाठी काँग्रेससह इतर अनेक पक्ष एकत्र झाले आहेत. तर दुसरीकडे मोदींसोबत काही राज्यातले प्रादेशिक पक्ष जोडले गेलेले आहेत.


