Share

मनमानी बिल आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांना एकनाथ शिंदेंचा जबर दणका, कारवाईचे दिले सक्त आदेश

Published On: 

ठाणे : कोरोना रुग्णां कडून मनमानी बिलांची वसुली करणाऱ्या खाजगी रुग्णालयां वर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांना दिले असल्याचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले . हि वेळ एकमेकांना मदत करण्याची असून कुणी गैरफायदा घेत असेल तर खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला .

मीरा भाईंदर मधील कोरोना संसर्ग आणि पालिके कडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनां बाबत आढावा घेण्यासाठी शिंदे यांनी मुख्यालयात बैठक घेतली . यावेळी खासदार राजन विचारे , आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन , महापौर ज्योत्सना हसनाळे , आयुक्त डॉ . विजय राठोड , विरोधीपक्ष नेते प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.

जोपर्यंत लस येत नाही तो पर्यंत कोरोना विरुद्धची लढाई सुरूच राहणार – छगन भुजबळ

दरम्यान, कोविड विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची खासगी दवाखान्यातील बिले लेखा परीक्षकांकडून तपासून घेतल्यावरच रुग्णांना दिली जावीत. त्यासाठी प्रत्येक खासगी रुग्णालयांसाठी स्वतंत्र लेखा परीक्षक नियुक्त करा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोलापूर येथे दिल्या होत्या.

खासगी दवाखान्यातून कोरोना उपचाराची मोठ्या रक्कमांची बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारीवर उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तक्रार निवारण समिती कार्यरत आहे. मात्र आता खासगी रुग्णालयाचे बिल स्वतंत्र लेखा परीक्षक तपासेल. शासनाच्या नियमानुसार योग्य आहे का याची शहानिशा करूनच रुग्णाला बिल दिले जाईल. शासनाने निश्चित केलेले दर केवळ कोरोना उपचारासाठी नाही तर सर्वच रोगांवरील उपचारासाठी आहेत. अस टोपे त्यावेळी म्हणाले होते.

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण – उद्धव ठाकरे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!