Share

लोकसभा निवडणूक लढवणे म्हणजे काय घरची मालमत्ता आहे का? – शालिनीताई पाटील

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : माजी महसूलमंत्री शालिनीताई पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मावळ मतदारसंघात जे झालं ते बरोबरच झालं. लोकसभा निवडणूक लढवणे म्हणजे काय घरची मालमत्ता आहे का? अशी टीका शालिनीताई पाटील यांनी केली आहे.

माजी महसूलमंत्री शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर जरंडेश्वर कारखान्यावरून निशाणा साधला. अजित पवारांना जरंडेश्वर कारखान्यातून आपल्या घरी माघारी घालवून कोरेगाव मतदारसंघात क्रांती घडवायची आहे असे पाटील यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, कारखान्याचे दहा हजार टनांचे एक्स्पांशन कोणाला विचारुन केलं? असा सवालही त्यांनी केला. तसेच माझा अडीच हजार टन क्षमतेचा कारखाना मला पुन्हा पाहिजे. त्या व्यतिरिक्त जे काय असेल ते तुम्ही बारामतीला उचलून न्या, असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती परंतु त्यांचा पराभव झाला. पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरूनही पाटील यांनी टीकास्त्र सोडले. मावळ मतदारसंघात जे झालं ते बरोबरच झालं, अशी टीका त्यांनी केली. इतकेच नव्हे तर, निवडणूक लढण्याआधी काही कामं करावी लागतात. लोकसभा निवडणूक लढवणे म्हणजे काय घरची मालमत्ता आहे का? आणि एकाच परिवारातील किती जणांनी निवडणूक लढवायची? असा सवालही त्यांनी केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!