Share

शाहीद कपूरचा कबीर सिंह ठरला ‘ब्लॉकबस्टर’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : अभिनेता शाहिद कपूरचा ‘कबीर सिंग’ हा चित्रपट २१ जूनला प्रदर्शित झाला असून गेल्या काहीच दिवसात या चित्रपटाने बरीच चांगली कमाई केल्याचे दिसते. त्यामुळे शाहिद कपूरला या चित्रपटामुळे करिअरसाठी पुन्हा नवीन संधी निर्माण होतील, अशी आशा त्याच्या चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे केवळ पाच दिवसामध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी २०.२१ कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर या चित्रपटाच्या आकडेवारीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे विकडेज मध्ये या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

 

‘कबीर सिंग’ने पहिल्या दिवशी २०. २१ कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २२.७१ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी २७.९१ कोटी रुपये, तर सोमवारी आणि मंगळवारी या चित्रपटाने अनुक्रमे १७.५४ आणि १६.५३ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपटाने एकूणच १०४.९० कोटी रुपयांची कमाई करून ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे.

दरम्यान, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही काळातच तो सोशल मिडियावर लीक झाला होता. पायरेटेड वेबसाईट तमिळ रॉकर्सवर हा चित्रपट लीक झाल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र लीक होऊनही या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!