Share

Eknath Shinde | उद्धव ठाकरेंनंतर एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना धक्का, मनसेच्या १०० पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

Published On: 

Eknath Shinde | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे गटाची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शिवसेनेच्या ४० आमदार आणि १२ खासदारांचा शिंदे यांना पाठिंबा आहे. मात्र यानंतर शिवसेनेचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे पक्षाची विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. तर इतर पक्षांमध्येही याचे पडसाद उमटत आहेत. मनसेचे नेतेही शिंदे गटात दाखल होत आहेत. नवी मुंबईतील पनवेल, उरण, खारघरमध्ये मनसेला खिंडार पडले आहे.

येथील माजी जिल्हाध्यक्षांसह 100 जणांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिंदे गटाचं बळ वाढलेलं दिसत आहे. रात्री उशीरा मुंबईमधील मलबार हिल येथील शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यात हा पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनसेच्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. मनसेचे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत यांच्यासह माजी खारघर शहर प्रमुख प्रसाद परब हेदेखील शिंदे गटात दाखल झाले. उरण आणि पनवेलमधील मनसे खारघरची पूर्ण टीम शिंदे गटात दाखल झाल्याचं चित्र आहे.

दरम्यान, आज शिवसेनेच्या यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी युती सरकारला पाठींबा जाहीर केल्यानंतर आज प्रथमच त्यांच्या मतदारसंघातील अनेक पदाधिकारी तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी उपस्थित राहून युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला. यावेळी खासदार भावना गवळी, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार भरतशेठ गोगावले, यवतमाळ वाशीम जिल्ह्यातील अनेक शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी पुरुष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!