Share

फाशी दिली जाणाऱ्या शबनमने साधला मुलाशी हृदय पिळवटून टाकणारा संवाद

Published On: 

नवी दिल्ली- स्वतंत्र भारतात प्रथमच महिलेला फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार आहे. उत्तर प्रदेशातल्या अमरोहामधील शबनम या महिलेनं २००८ साली आपल्या प्रियकरासोबत आपल्या नात्यातल्या 7 जणांचा कुऱ्हाडीने खून केला होता. या प्रकरणात शबनम अलीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

या क्रूरकर्मा महिलेचा राष्ट्रपतींनीही दयेचा अर्ज फेटाळला आहे. मथुरा जेलमध्ये तिला फाशी होईल. फाशीच्या अंमलबजावणीची तयारी सुरू झाली आहे. निर्भया प्रकरणातल्या आरोपांना फाशी देणारा पवन जल्लादचीच या फाशीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. फाशीची तारीख मात्र अजून निश्चित झालेली नाही.

दरम्यान,मथुरा कारागृहात दीडशे वर्षांपूर्वी एक महिला फाशी घर बांधले गेले होते. पण स्वातंत्र्यानंतर कोणत्याही महिलेला फाशी देण्यात आलेली नाही. वरिष्ठ जेल अधीक्षक शैलेंद्र कुमार मैत्रेय म्हणाले की, फाशीची तारीख अद्याप निश्चित केलेली नाही, परंतु आम्ही तयारी सुरू केली आहे. मृत्यूची वॉरंट निघताच शबनमला फाशी देण्यात येईल.बिहारमधील बक्सरमधून फाशीसाठी दोरखंड मागवण्यात आला आहे.

दरम्यान, शबनमने मुरादाबाद कारागृहात एका बाळाला जन्म दिला होता.शबनम सोबत तिचा मुलगा सहा वर्ष कारागृहातच रहात होता. मात्र, त्याच्या भविष्याचा विचार करून अमरोहा येथील बाल कल्याण समितीने या मुलाला बुलंदशहर येथील एका दाम्पत्याला दत्तक दिले होते.

या दाम्पत्याने 15 दिवसांपुर्वी त्यांच्या खऱ्या आईशी त्याची भेट घालून दिली. सुमारे 40 मिनिटे हा माय लेकरांचा संवाद सुरू होता. यावेळी शबनमने आपल्या मुलाला खूप अभ्यास कर आणि नव्या आई- बाबांना अभिमान वाटेल असे यश मिळव… मला विसरू नकोस…. पण मी चांगली बाई नसल्याने मला भेटायचा हट्ट धरू नकोस…, हा सल्ला तिने दिला.त्याआधी तिच्या मुलाने आपल्या आईला विचारले, तू नेमका काय गुन्हा केला आहे? त्यावर ती म्हणाली की तिला यात फसवलं गेले असून याची चौकशी करण्याची तिची मागणी पूर्ण झालेली नाही.

शबनमच्या मुलाच्या नव्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार,ते या मुलाला तीन चार महिन्यातून एकदा आईला भेटण्यासाठी कारागृहात घेऊन जातात. लवकरच डेथ वॉरंट निघेल. फाशीची तारीख निश्चित होईल, त्यावेळी आईशी शेवटची भेट घालून देण्यासाठी आम्ही पुन्हा घेऊन जाऊ.दरम्यान,शबनमच्या मुलाचा फोटो इंटरनेट आणि समाजमाध्यमांत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यात राष्ट्रपती काका माझी आई शबनमला माफ करा अशी विनंती तो करत आहे.

दरम्यान, शबनमने  कुटुंबातील लोकच तिच्या प्रेमात आडकाठी ठरत होते यामुळे तिने प्रियकरासोबत मिळून तिने आपल्याच कुटुंबियांना संपविण्याचे दुष्कृत्य केले होते. अमरोहाच्या हसनपूरमधील बावनखेडी गावात २००८ च्या १४ एप्रिलच्या रात्री ही घटना घडली होती. इथे शबनमने आपला प्रियकर सलीमसोबत मिळून आपले वडील, शिक्षक शौकत, आई हाशमी, भाऊ अनीस आणि रशीद, वहिणी अंजुम आणि चुलत बहीण राबिया यांची कुऱ्हाडीने कापून हत्या केली होती. भाचा अर्शचा गळा आवळला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!