बीड : सौ. के. एस. के. महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र व प्राणिशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मानवी कल्याणासाठी जीवविज्ञान’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर होत्या. या चर्चासत्राप्रसंगी डॉ. अशोक चव्हाण यांनी सूक्ष्म जीवांचे मानवी जीवनातील महत्त्व विशद केले. तसेच अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर यांनी ‘वैज्ञानिक संशोधनाचे महत्त्व व त्यांची दैनंदिन जीवनातील उपयुक्तता’ याचे महत्त्व या विषयावर प्रकाश टाकला.
या चर्चासत्रात डॉ. राम चव्हाण, डॉ. एन. जी.काशीद यांनी मार्गदर्शन केले. या चर्चासाठी देशभरातून १६५ प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला. या वेळी उपप्राचार्य डॉ. ए. एस. हंगे, उपप्राचार्य शिवानंद क्षीरसागर, डॉ. राजा मचाले, पदव्युत्तर विभागप्रमुख डॉ. रेखा गुळवे, उपप्राचार्य सय्यद लाल, पर्यवेक्षक प्रा. जालिंदर कोळेकर यांची उपस्थिती होती.
महत्वाच्या बातम्या
- पियुष गोयल शेतीतज्ज्ञ आहेत हे कळाल्याने माझ्या ज्ञानात भर पडली : शरद पवार
- ‘उस्मानीचे भाषण ऐकले नाही, मुळात एल्गार परिषदेला महत्व देत नाही’
- भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा मोदींचा डाव; ‘या’ मंत्र्याचा आरोप
- शेतकरी आंदोलनावरील आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियांवर पंतप्रधानांच भाष्य
- भीषण : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला उत्तराखंड दुर्घटनेचा आढावा


