Share

विश्वास नांगरे पाटील आणि इतर मराठा संघटनांकडून माझ्या जीवाला धोका : गुणरत्न सदावर्ते

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. मराठा समाजाला शिक्षणात १२ तर नौकरीत १३ टक्के आरक्षणाला मान्यता मिळाली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याविषयी बोलताना ‘हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात मी सुप्रीम कोर्टात जाणार आहे. मराठा आरक्षणाबाबतचा निकाल घटनाबाह्य असून तो दबावाखाली दिला गेला आहे. पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील आणि इतर मराठा संघटनांकडून माझ्या जीवाला धोका आहे. उद्या माझं काही बरं वाईट झाल्यास त्याला नांगेर पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील,’ असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

दरम्यान, मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाच्या निर्णयाचं सगळीकडून कौतुक होत आहे. या निर्णयामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणात आणि नोकरीत फायदा होणार आहे त्यामुळे मराठा समाजात आनंदाचे वातावरण आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!