Share

रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत, संजय राऊतांचा दावा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- प्रभू रामचंद्राच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत. तसंच राम मंदिराचा मुद्दा आम्ही कधीही राजकीय मुद्दा म्हणून समोर आणला नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. अयोध्येत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. विजयी खासदारांसह ठाकरे रविवारी सकाळी रामलल्लाचे दर्शन घेतील. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी अयोध्येत जाऊन पत्रकार परिषद घेतली. लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर इथे येणार असल्याचे वचन उद्धव ठाकरे यांनी दिले होते. ते वचन पूर्ण करण्यासाठीच ते इथे येणार आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!