Sanjay Raut | मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाच्या (Maharashtra-Karnataka border dispute) मुद्द्यावर माध्यमांशी संवाद साधला. हा नव्याने निर्माण झालेला वाद स्क्रिप्टेड असल्याचे राऊत म्हणाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) भाजपने लिहिलेली स्क्रिप्ट वाचत आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे राज्यातील जनतेच्या मनातील संतापावरून लक्ष हटवण्याचा हा डाव असल्याचे संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होत असून, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जंतरमंतर आणि ज्योतिषी यांच्याभोवती फिरण्यापासून वेळ मिळत नाही. ज्यांच्यात आत्मविश्वास नसतो, तेच इकडे तिकडे हात आणि कुंडली दाखवतात. मला देखील ज्योतिषाचा अभ्यास आहे. येत्या काळात एकनाथ शिंदेंचा सत्तायोग लिहिला गेला नाही. जनतेने त्यांची भावी कुंडली लिहिली आहे. जे अघोरी विद्येत गुंततात त्यांनी हे जाणून घ्यावे की अघोरी विद्येत अडकलेल्यांचा अंत भयानक आहे. त्यांचा अंतही अघोरीसारखाच होईल, असे संजय राऊत म्हणाले.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची मागणी स्क्रिप्टेड –
संजय राऊत म्हणाले, “कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रावर अचानक हल्ला केला आहे. याच्यामागे फार मोठ कारस्थान आणि षडयंत्र आहे. महाराष्ट्रात भाजप नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी यांनी वादग्रस्त विधान केले. त्यामुळे या सरकार विरुद्ध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्याच्यावरचे लक्ष विचलित व्हावे, शिवाजी महाराजांच्या अपमानाचा विषय मागे पडावा. म्हणून बोम्मईंना पुढे करुन महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगण्याचा हा प्रयत्न आहे. लोकांनी दुसऱ्या विषयाकडे वळावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान विसरावा. हे ठरलेलं स्क्रिप्ट आहे.”
संजय राऊत म्हणाले की, भाजप हा शिस्तीवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. भाजपशासित राज्याचा मुख्यमंत्री दुसर्या भाजपशासित राज्याच्या मुख्यमंत्र्याविरुद्ध आक्रमक झाल्याचे यापूर्वी कोणी पाहिले आहे का? गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात कधी काही बोलल्याचे कोणी पाहिले आहे का? पण आज कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहेत. कारण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना ही स्क्रिप्ट लिहून दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | “आत्मविश्वास होता म्हणून…”, ज्योतिषाकडे जाण्यावरुन शरद पवारांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर
- IND vs BAN | बांगलादेश दौऱ्यावर जडेजाच्या जागी खेळणार ‘हा’ खेळाडू
- Sanjay Raut | कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची मागणी स्क्रिप्टेड ; संजय राऊत यांचा भाजपवर आरोप
- Saamana | “खोके सरकारात जीव नाही की…”, सामनातून शिंदे गटावर घणाघात
- Eknath Shinde | शिंदे गटातील ‘या’ आमदाराने केलं शरद पवारांचं कौतुक, राजकीय चर्चांना उधाण


