टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना नेते संजय राऊत यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना फेसबुकच्या माध्यमातून वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. राऊत यांना आदित्य यांना गळाभेटीचा एक फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. ‘महाराष्ट्र खरंच तुझी वाट बघत आहे.’ असं फोटोच्या खाली कॅप्शन दिले आहे. या पोस्ट मधून राऊत यांनी आदित्य ठाकरे येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेतच दिले आहेत.
दरम्यान, आदित्य ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील की नाही, याबाबत अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा असेल, असे संजय राऊत यांनी बुधवारी सांगितले होते.
https://www.facebook.com/sanjay.raut.100/posts/10210374439077850
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

