तुळजापूर- तीन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीराजे मराठवाड्याच्या दुष्काळी अभ्यास दौऱ्यावर उस्मानाबादला आले होते. यावेळी राजेंनी मराठवाड्याच्या हक्काच्या २१ टी एम सी संदर्भात पाठपुरावा करणार, असा शब्द श्रीतुळजाभवानी दर्शना नंतर पञकार परिषदेत दिला होता तो पाळीत त्यांनी आणि तीन दिवसांच्या आत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा वरती जावुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उस्मानाबाद जिल्हयातील भीषण दुष्काळ ची माहीती दिली व २१ टी एम सी पाण्या संदर्भात चर्चा केली.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, यावर सरकार गंभीर असून लवकरात लवकर तोडगा काढला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी निवेदन देताना छत्रपती संभाजी राजेंसोबत , तुळजापूर तालुक्याचे सुपुत्र आणि संभाजीराजेंचे घनिष्ठ मित्र योगेश केदार उपस्थित होते.


