अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणुच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सरकारने लॉकडाऊन केले होते. सध्या लॉकडाऊन हळूहळू हटविण्यात येत असून जनजीवन पूर्व पदावर येत आहे. दुसरीकडे दैनंदिन रुग्णांकरीता अथवा प्लॅन शस्त्रक्रिया, तातडीचे शस्त्रक्रिया करीता रक्ताची टंचाई भासत चालेली आहे.
ही टंचाई दूर करण्यासाठी शिर्डी संस्थांनने पुढाकार घेतला आहे. रक्ताची ही टंचाई काही प्रमाणात दूर व्हावी, यासाठी शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या वतीने २४ नोव्हेंबर रोजी साईआश्रम-एक निवासस्थान येथील शताब्दी मंडपामध्ये रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे.
श्री साईबाबा संस्थानची श्री साईनाथ रक्तपेढी ही महाराष्ट्रातील नामांकीत रक्तपेढी असून नगर जिल्ह्यातील जवळजवळ निम्याहून अधिक रक्तपुरवठा या रक्तपेढी मार्फत करण्यात येतो. परंतु सध्या दैनंदिन रुग्णांकरीता अथवा प्लॅन शस्त्रक्रिया तसेच तातडीचे शस्त्रक्रिया करीता रक्ताची टंचाई भासत चालली आहे.
सध्याच्या स्थितीला श्री साईनाथ रक्तपेढीमध्ये पुरेसा रक्तसाठा उपलब्ध नाही. तसेच कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेता गरजू रुग्णांसाठी रक्तांची निकड लक्षात घेऊन श्री साईबाबा संस्थानच्या वतीने येत्या मंगळवारी (२४ नोव्हेंबर) सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या रक्तदान शिबीरामुळे रक्ताची टंचाई काही प्रमाणात कमी होण्यास नक्कीच मदत होईल. त्यामुळे जास्तीत जास्त इच्छुक शिर्डी ग्रामस्थ, साईभक्त व संस्थान कर्मचारी यांनी या रक्तदान शिबीरात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पोटात येऊ लागला पुन्हा भितीचा गोळा; ‘या’ जिल्ह्यात कोरोना पुन्हा वाढतोय!
- शिर्डी नगरपंचायतवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी कटिबद्ध व्हा- राधाकृष्ण विखेंचे कार्यकर्त्यांना आदेश!
- ‘फ्युज उडालेल्या सरकारकडून गोरगरीब वीज ग्राहकांना काहीच मिळणार नाही’
- ‘रेमेडिसविर’ औषध कोरोनावर गुणकारी नाही ; WHO ने केले औषधांच्या यादीतून बाद
- कृषि विद्यापीठाच्या संशोधनानंतर ‘ड्रॅगन फ्रुट’च्या लागवड क्षेत्रात वाढ !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

