Share

लॉकडाऊनमुळे साई संस्थानच्या देणगीत १८२ कोटींची घट!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाने राज्यातील सर्व धार्मिक मंदिरे बंद ठेवली आहेत. मार्च महिन्यापासून शिर्डीचे साई मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. मार्च महिन्यापासून ३१ ऑगस्टपर्यंत साई भक्तांकडून विविध प्रकारे २० कोटी ७६ लाख ५४ हजार १५१ रुपये देणगी संस्थानला प्राप्त झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत २०३ कोटी ३७ लाख ७१ हजार ७९५ रुपये इतकी देणगी संस्थानला प्राप्त झाली होती. मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे १८२ कोटी ६१ लाख १७ हजार ६४४ रुपये इतकी देणगीची घट झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिली.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे मार्चपासून शिर्डीचे साई मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेली आहे. मागील वर्षी मार्च महिन्यापासून ३१ ऑगस्ट २०१९ या कालावधीत दक्षिणापेटीद्वारे साई भक्तांकडून ७५ कोटी २९ लाख ७८ हजार ९२७ रुपये इतकी देणगी संस्थानला प्राप्त झाली होती. मात्र यावर्षी मंदिर बंद असल्यामुळे दक्षिणापेटीद्वारे साई भक्तांकडून कोणतीही देणगी प्राप्त झाली नाही.

लॉकडाऊनमुळे साई संस्थानच्या देणगीत सुमारे १८२ कोटींची घट झाली आहे. मार्च महिन्यापासून ३१ ऑगस्टपर्यंत विविध प्रकारे २० कोटी ७६ लाख ५४ हजार १५१ रुपये संस्थानला प्राप्त झाले असून, संस्थांनद्वारे प्रति महिन्याला कर्मचारी वेतनावर सुमारे १२ कोटी रुपये खर्च होत असल्याचे बगाटे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:-

विदर्भ व मराठवाड्यातील प्रलंबित कृषीपंप वीज जोडण्या देण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून घेणार कर्ज

एका एका खाटेसाठी जातोय कोरोना रुग्णांचा जीव, काँग्रेसच्या आमदाराची अजित पवारांकडे ‘ही’ मागणी 

‘तिचे ट्विट माहित नाही, आम्ही फक्त सामना वाचतो’ : संजय राऊत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!