मुंबई : मुंबईतील एका क्रुझवर धाड टाकल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी करण्यात आली. या ड्रग्ज प्रकरणामुळे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे प्रचंड चर्चेत आले आहेत. नुकताच वानखेडे यांनी पोलीस आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला आहे.
वानखेडे यांच्या या आरोपांमुळे विरोधकांना सरकारला टार्गेट करण्याची संधी मिळाली असून या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. वानखेडे यांच्यावर पाळत ठेवण्याचे कुठलेही आदेश पोलिसांना दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
ड्रग्ज माफीया आणि महाराष्ट्रातील सरकारची मिलीभगत आहे का? आणि त्यामुळे सरकारला समीर वानखेडे याचावर पाळत ठेवावी लागत आहे का?
हप्ते सुरू असल्यामुळे महाविकास आघाडी सरकार ड्रग्ज माफीयाची पाठराखण करत आहे.
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) October 12, 2021
दरम्यान, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी याच मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, ड्रग्ज माफीया आणि महाराष्ट्रातील सरकारची मिलीभगत आहे का? आणि त्यामुळे सरकारला समीर वानखेडे यांच्यावर पाळत ठेवावी लागत आहे का? हप्ते सुरू असल्यामुळे महाविकास आघाडी सरकार ड्रग्ज माफियांची पाठराखण करत आहे असा आरोप देखील त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची करडी नजर?; पुराव्यासह केला आरोप
- ‘जर धोनी भाई खेळत नसेल तर…’, सुरेश रैनाचा आयपीएल निवृत्ती योजनेबद्दल मोठा खुलासा
- आरसीबी फक्त 10 खेळाडूंसह खेळत होता; परभावानंतर सेहवाची संघावर टीका
- ‘घरातील विद्युत उपकरणांचा कमीत कमी वापर करत वीज बचत करून महावितरणला सहकार्य करा’
- ‘हा प्रश्न मला विचारू नका’ म्हणत चालू मुलाखतीतून माईक फेकून मलिक निघून गेले


