Share

मराठा आरक्षणाच्या जल्लोषात मुका मोर्चा म्हणणारे सामील का? – सचिन सावंत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर विधान भवनात भाजप – सेनेच्याचं आमदारांनी नव्हे तर विरोधी पक्षांनीही आनंद व्यक्त केला. दरम्यान कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. यात मुका मोर्चा म्हणणारेही सामील का? असा सवाल सचिन सावंत यांनी केला.

मुंबई उच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर लागणाऱ्या अंतिम निकालाकडे संपूर्ण राज्य आणि देशाचे लक्ष लागले होते. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर निर्णय दिला असून, नोकरी आणि शिक्षणिक शेत्रातील आरक्षण वैध असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षणात १२ तर नौकरीत १३ टक्के आरक्षणाला मान्यता दिली.

दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयावरून संपूर्ण राज्यात जल्लोषाचे वातावरण तयार झाले असून, या निर्णयाचे स्वागत विधान भावनातही करण्यात आले. त्यावेळी, भाजप- शिवसेनेच्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला. शिवसेनेच्या या आनंद व्यक्त करण्यावरून सचिन सावंत यांनी शिवसेनेला टोला लगावला. यात मुका मोर्चा म्हणणारेही सामील का? असा सवाल सचिन सावंत यांनी केला.
मराठा आरक्षणासाठी सुरु करण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाचा शिवसेनच्या मुखपत्र असलेल्या सामनामध्ये मूक मोर्चा म्हणून उल्लेख करण्यात आला होता.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!