Share

Rutuja Latke | मुरजी पटेल यांनी माघार घेताच ऋतुजा लटके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  राज ठाकरे यांच्या पत्रानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांची मतं लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं होतं. यानंतर भाजप नेत्यांच्या बैठका सुरु झाल्या. यामध्ये भाजपचे उमेदवार मुरजी पटेल अर्ज मागे घेतील आणि अपक्ष म्हणूनही लढणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला. तसेच भाजपकडून मुरजी पटेल यांनी माघार घेतल्यानंतर ऋतुजा लटके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ऋतुजा लटके यांची प्रतिक्रिया दिली –

सर्व प्रथम मी सर्वांचे आभार मानते, सगळ्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारी अर्जमागे घेण्याची पत्रं दिली, त्यांनी अर्ज मागे घेतला, प्रत्येकजण म्हणत होते रमेश लटके आमच्यासोबत होते, त्यांचे सर्वांशी चांगले संबंध होते, त्यामुळे हा निर्णय झाला असावा, असं म्हणत माझ्या पतीचे सर्वच राजकीय नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते, त्याची पोचपावती मला मिळाली, अशी प्रतिक्रिया ऋतुजा लटके यांनी दिली आहे.

बिनविरोध निवडणूक व्हावी हे सर्वांचं म्हणणं होतं. गेल्या आठ दिवसांपासून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. प्रचारासाठी त्यांनी कष्ट घेतले. त्या सर्वांचे आभार मानून ऋणी राहील. राज ठाकरे आणि प्रताप सरनाईक यांनी मैत्रीची कदर केली, असं म्हणत ज्येष्ठ नेते शरद पवारांनी पाठिंबा दिला, त्यांची ऋणी राहील, अंधेरीचा विकास हेच माझं पहिलं ध्येय असणार असल्याचं त्या म्हणाल्या.

ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विरोधात उमेदवार देऊ नका, हे आपल्या संस्कृतीशी सुसंगत नाही असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपला उमेदवार न देण्याची भावनिक साद घातली होती. यावर चर्चा करून निर्णय देऊ असं भाजपच्या वतीने सांगण्यात आलं होत. यानंतर सकाळीही देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मेघदूत’ बंगल्यावर भाजपा नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणूक अर्ज घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!