Share

मंत्रिमंडळ विस्तारात रिपाईला मंत्रिपद मिळण्याची शक्यता, आठवलेंनी दिले संकेत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेला घवघवीत यश मिळाले आहे. हे यश मिळण्यामध्ये रिपाई पक्षाचा खूप मोठा हातभार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात एका मंत्रिपदाची मागणी रिपाई अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. रामदास आठवले यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या भेटी नंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी आठवले म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एका मंत्रिपदाची मागणी तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत १० जागा आणि रिक्त महामंडळांवरील नियुक्त्या, अशा सर्व मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्या आहेत. तसेच मुंबईतील राजग्रह येथील डॉक्टर आंबेडकरांचे घर राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करावे. त्यासाठी सध्या तिथे राहत असलेले प्रकाश आंबेडकर यांचे कुटुंबीय आणि भाडेकरू त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात यावे, अशीही मागणी आठवले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

दरम्यान बहुप्रतीक्षित राज्य मंत्रिमंडळ विस्तार या आठवड्यात होणार असल्याची चर्चा मागील दोन आठवड्यापासून सुरु होती, खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील याला दुजोरा दिला होता, मात्र त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याची चर्चासुरु झाली होती. मात्र अखेर रविवारी सकाळी ११ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!