टीम महाराष्ट्र देशा: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जत – जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रोहित पवार यांनी तब्बल ३ हजार मतांची आघाडी घेतली आहे. सुरुवातीला राम शिंदे हे आघडीवर असल्याचं वृत्त आले होते. मात्र पहिल्या फेरी अखेर रोहित हे आघाडीवर आहेत.
राज्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेली लढत म्हणजे कर्जत जामखेडमधील राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यातली. राम शिंदे हे राज्य सरकारमधील मंत्री आहेत. तर रोहित पवार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आहेत. दोनही उमेदवारांनी या ठिकाणी विजय मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोण वरचढ याचा फैसला लवकरच होणार आहे.
दरम्यान, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या राम शिंदे यांनी 84 हजार 058 एवढी मते घेत विजय मिळवला. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना चे रमेश खाडे होते. त्यांना 46 हजार 242 मते मिळाली. आणि त्यांचा 37 हजार 816 मतांनी पराभव झाला.
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवाराचे आज नशीब उलगडणार आहे. काही वेळातच मतमोजणीला सुरवात होणार आहे. 288 मतदारसंघात एकाच टप्यात मतदान झाले होते. त्यामुळे मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1187204896161878016?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1187204805007011840?s=20


