Share

Rishabh Pant | दिल्लीत ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात, डोक्याला झाली गंभीर दुखापत

Published On: 

🕒 1 min read

Rishabh Pant | दिल्ली: भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) च्या कारचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातामध्ये पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून घरी परतताना त्याच्या कारचा हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हम्मादपुर झाल जवळ रुरकीच्या नरसन सीमेवर वळण घेत असताना त्याच्या कारचा अपघात झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रिषभ पंतच्या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या पंतची प्रकृती स्थिर असून, त्याला डेहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. पंतच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ पंत स्वतः गाडी चालवत होता. गाडीमध्ये तो एकटाच होता. अपघात झाल्यानंतर त्याच्या गाडीला आग लागली. त्यानंतर स्थानिकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. सध्या रिषभची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

ऋषभ पंतला आत्तापर्यंत 66 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये त्याने 987 धावा आपल्या नावावर केल्या आहे. या धावा त्याने 22 च्या सरासरीने केल्या आहेत. या सामन्यांमध्ये त्याचा स्ट्राईक रेट केवळ 126 होता. त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये तीन अर्धशतके केली आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!