Share

भाजप शिवसेनेत जागावाटप आणि सत्तेत भागिदारीचा ‘फिफ्टी-फिफ्टी’ फॉर्म्युला निश्चित – चंद्रकांत पाटील

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: विधानसभा निवडणुकांना अवघे तीन ते चार महिने राहिल्याने सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेनं युती केली होती, त्यामुळे विधानसभेसाठी देखील युती होणार हे निश्चित आहे. मात्र मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षातील नेत्यांमधील मतभेद उघड झाले आहेत.

दरम्यान, आता भाजप शिवसेनेत जागावाटप आणि सत्तेत भागिदारीचा ‘फिफ्टी-फिफ्टी’ फॉर्म्युला निश्चित झाल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.

शिवसेना – भाजपची युती निश्चित आहे. विधानसभेच्या ५०  टक्के जागा आणि सत्तेत ५० टक्के भागीदारी हा युतीच्या फॉर्म्युल्याचा मूळ गाभा आहे. जागावाटपाच्या चर्चेला बसल्यावर मतदारसंघाच्या अदलाबदलीबाबत योग्य तो तोडगा काढला जाईल, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यामध्ये १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान निवडणुका होणार असल्याचे भाकीत पाटील यांनी वर्तवले आहे, तसेच लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपला २२८ विधानसभा मतदारसंघांत मताधिक्य आहे. त्यामुळे आगामी विधानसभेला २८८ जागांपैकी २२० जागा युती जिंकेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!