माजलगाव : इसवी सन 2020 ते 2025 या पाच वर्षांसाठी माजलगाव तालुक्यातील 109 गावांसाठी 91 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदांचे आरक्षण आज जाहीर झाले. माजलगावच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनी तहसील कार्यालयात सोडत पद्धतीने हे आरक्षण जाहीर केले.
यानिवडीनंतर माजलगाव तालुक्यातील 91 ग्रामपंचायतींच्या कारभारी निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडीत माजलगावातील 15 ग्रामपंचायतीत अनुसूचित जाती प्रवर्ग, यात 7 पुरुष व 8 महिलांचा समावेश आहे. ओबीसी प्रवर्गातील 24 सरपंचा पैकी 12 महिला व 12 पुरुष, अनुसूचित जमाती प्रवर्गात दिंद्रुड ही एकमेव ग्रामपंचायत आहे. उरलेल्या 51 ग्रामपंचायतींमध्ये खुल्या वर्गातील सदस्यांना सरपंचपदाची संधी मिळणार आहे. खुल्या प्रवर्गात 26 महिला व 25 पुरुष असे आरक्षण सुटले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत बहुतांश ठिकाणी पॅनल बहुमतात आहेत, तर अनेक ठिकाणी कमी विजयी सदस्यांमध्ये द्विधा स्थिती आहे. अनेक गावातील सदस्यांना त्यांच्या पॅनलने सहलीवर पाठवलेले आहे. आता आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर एकीकडे बहुतांश जणांना संधी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते, तर अनेक जण हिरमुसलेले दिसून आले.
महत्वाच्या बातम्या
- पियुष गोयल शेतीतज्ज्ञ आहेत हे कळाल्याने माझ्या ज्ञानात भर पडली : शरद पवार
- ‘उस्मानीचे भाषण ऐकले नाही, मुळात एल्गार परिषदेला महत्व देत नाही’
- भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा मोदींचा डाव; ‘या’ मंत्र्याचा आरोप
- शेतकरी आंदोलनावरील आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियांवर पंतप्रधानांच भाष्य
- भीषण : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला उत्तराखंड दुर्घटनेचा आढावा


