Share

Atul Bhatkhalkar : “ही जगातली एकांडी घटना असावी” ; अतुल भातखळकरांचा शिवसेनेला खोचक टोला

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राचे राजकारण मोठा खेळ बनल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे गटाने मॅजिक फिगर 37 वर पोहोचल्याचा दावा केला आहे. शिवसेनेचे आमदार दीपक केसरकरही शिंदे गटात दाखल झाले आहेत. आज सकाळी शिवसेनेचे दोन आमदार मंगेश कुडाळकर आणि सदा सरवणकर गुवाहाटी हॉटेलमध्ये पोहोचले. जर शिंदे गटात 37 आमदार झाल्यास हा आकडा दोन तृतीयांश होईल आणि त्यानंतर पक्षांतरविरोधी कायदा शिंदे कॅम्पला लागू होणार नाही. एकनाथ शिंदे आधीच भाजपसोबत सरकार स्थापन करण्यावर ठाम आहेत. दरम्यान शिवसेनेच्या आमदारांची संख्या हळूहळू कमी होत आहे. यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांना सोडून अवघे मंत्रिमंडळ पक्षाच्या आमदारांसह फुटते ही जगातली एकांडी घटना असावी, असे अतुल भातखळकर म्हणाले.

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले राजकीय संकट हे चित्रपटाच्या स्क्रिप्ट पेक्षा कमी नाही. इथे सूड, बंड आणि नाटक हेच सगळं आहे. शिवसेनेचे आमदार दीपक वसंत केसरकर यांनी देखील उद्धव ठाकरे यांना अल्टिमेटम दिला होता. त्यांचे म्हणणे न ऐकल्यास आपण मार्ग काढू, असे त्यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान आज ते गुवाहाटीत दाखल झाले.

खरे तर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे दीपक केसरकर यांनाही शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी संबंध तोडून भाजपशी हातमिळवणी करावी, असे वाटते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ त्यांचे सरकार गमावत नाहीत, तर त्यांचा पक्ष शिवसेनाही कमकुवत होत आहे. पहिल्या दोन तृतीयांश आमदारांनी बंडखोरीची भूमिका घेतली आहे. आता काही खासदारही पक्ष सोडू शकतात, अशा बातम्या येत आहेत. खासदार राजेंद्र गावित, भावना गवळी आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे हे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!