🕒 1 min read
Gujarat Election Result । जामनगर : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांसोबतच इतर राज्यांतील सहा विधानसभा आणि लोकसभेच्या एका जागेवरील पोटनिवडणुकीच्या निकालांची मतमोजणी सुरू आहे. गुजरात निवडणुकीच्या निकालात भाजपला बहुमत मिळाले आहे. हिमाचलमध्येही आधी भाजपला बहुमत मिळाले होते, पण नंतर काँग्रेसने भाजपला मागे पाडले आणि काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला. हिमाचल प्रदेशमध्ये सध्या भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
मतांची आकडेवारी पाहता गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार हे स्पष्ट दिसतय. सध्याच्या निकालानुसार भाजपा 149 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 20 आणि आम आदमी पार्टी 8 जागांवर आघाडीवर आहे.
गुजरातच्या या निवडणुकीत जामनगर उत्तरच्या निवडणुकीकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. कारण इथून भाजपाने प्रसिद्ध क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजा (Rivaba Jadeja) यांना उमेदवारी दिली आहे. रिवाबाच्या प्रचारासाठी स्वत: रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) मैदानात उतरला होता.
सध्याची आकडेवारी पाहायला गेलं तर रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) 12 हजारपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे रिवाबा यांना जामनगर उत्तरमधून मोठा विजय मिळवण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये 27 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. यावेळी भाजप विक्रमी विजयासह सरकार स्थापन करणार असल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Himachal Pradesh Election Result | हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे की टक्कर! काँग्रेस आघाडीवर
- Amol Mitkari | “विजय शिवतारे यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये…”; अमोल मिटकरींचा घणाघात
- Tecno Pova 4 | उत्कृष्ट फीचर्ससह लाँच झाला टेक्नोचा Tecno Pova 4 मोबाईल
- Amol Mitkari | “सुरतमार्गे गुवाहाटीला जाणाऱ्या बहाद्दर आमदारांनो…”; सीमाप्रश्नावरून अमोल मिटकरींचा शिंदे गटावर हल्लाबोल
- Election Results | गुजरातमध्ये भाजपची विक्रमी बहुमताकडे वाटचाल, हिमाचलमध्ये काँग्रेस आघाडीवर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
