मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने नव्याने पक्ष बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मागील तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षाची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी मेहबुब शेख यांची निवड करण्यात आली होती, तर कार्याध्यक्षपदी सुरज चव्हाण व रविकांत वरपे यांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही नियुक्ती केली होती.
पक्षासंघटनेचा भाग म्हणून यांनीही युवक राष्ट्रवादीत अनेक फेरबदलाचे संकेत दिले होते. त्याचाच भाग म्हणून मेहबुब शेख यांनी राष्ट्रवादीच्या युवक जिल्हा प्रभाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. विविध जिल्ह्यांच्या जिल्हा प्रभारीपदी राष्ट्रवादीने तरूण कार्यकर्त्यांना संधी दिली आहे.
यांना मिळाली संधी-




