Share

‘अमित शहांना उद्घाटनासाठी कोकणात आणणारे राणे हे हुशार राजकारणी’

Published On: 

सिंधुदुर्ग:- भाजप नेते नारायण राणे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं आज सिंधुदुर्गात उद्घाटन करण्यात आलं आहे. नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडलं आहे. अमित शहांच्या या कोकण दौऱ्याला राजकीय महत्व प्राप्त झालं आहे.

भाजपचे बडे नेते एकत्र आले असून हा कार्यक्रम जरी राजकीय नसला तरी राज्यातील राजकारणावर हे नेते काय भाष्य करणार याची उत्सुकता वाढली होती. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी फासे बदलणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे अमित शाह राज्यात आल्याने ऑपरेशन लोटसचा मुहूर्त ठरणार का ? अशा चर्चा देखील सुरु झाल्या होत्या.

दरम्यान, नारायण राणे हे खूप हुशार राजकारणी आहेत. त्यांनी स्वत:च्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी अमित शाह यांना कोकणात बोलावले, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. नारायण राणे हा सामान्य माणसाच्या हिताचा विचार करणारा नेता आहे. नारायण राणे यांनी अमित शाह यांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी बोलावून एक स्वप्न साकार केले. आता त्यांनी कोकणात रोजगारनिर्मिती करण्यासाठी अमित शाह यांना विनंती करावी, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!