टीम महाराष्ट्र देशा: नीरा देवधरच्या पाण्यावरून भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडीत पकडल्याचे चित्र पहायला मिळत आहे, नियमबाह्यपणे बारामतीला वळवण्यात आलेले नीरा देवधरचे पाणी बंड करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे, पाणी बंद करण्याचा अध्यादेश राज्य सरकारने बुधवारी काढला. दरम्यान, आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येचं मोठे वादळ निर्माण होणार असल्याचं पहायला मिळत आहे.
नीरा देवधरच्या पाणी वाटपावरून खा. उदयनराजे भोसले यांनी माढ्याचे खा. रणजितसिंह निंबाळकर यांची पाठ थोपटताना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला होता, आता उदयनराजे यांच्या वक्तव्याने संतापलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजेंना आवरा, अन्यथा पक्षातून बाहेर पडू, असा इशारा शरद पवारांना दिला आहे.
नेमक काय म्हणाले रामराजे निंबाळकर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मीटिंग बोलावली आहे. त्यात त्यांना सांगणार आहे, तुमच्या खासदाराला आवरा नाही तर आम्ही पक्षातून बाहेर पडायला मोकळे आहोत, असा इशारा रामराजे यांनी दिला आहे.
लाल बत्तीचा वापर लोकांची खिल्ली उडवण्यासाठी – उदयनराजे
दुष्काळी भागाला पाणी देण्याचा अध्यादेश चौदा वर्षात का काढला नाही, असा सवाल करत उदयनराजे भोसले यांनी रामराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री, कृष्णा खोऱ्याचे मंत्री तसेच स्वतःला भगीरथ समजणाऱ्याने फक्त लाल बत्तीचा वापर लोकांची खिल्ली उडवण्यासाठी केल्याचा टोला उदयनराजे यांनी लगावला आहे. जेव्हा आपण लाल बत्तीच्या गाडीतून फिरतो, पुढे मागे संपूर्ण खात्याचा उपभोग घेतो, संबंधित खात्याचे मंत्री म्हणून काम केले असते तर आज खंडाळा, फलटण, सांगोला आणि पंढरपुरच्या लोकांनी आशीर्वाद दिले असते, असही उदयनराजे म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

