टीम महाराष्ट्र देशा :- विधानसभा निवडणुकीच्या निकालाला काही तास शिल्लक असतानाच कर्जत जामखेडचे भाजप उमेदवार राम शिंदे यांनी मोठे विधान केले आहे. पवार कुटुंबाने मोठ्या प्रमाणावर पैसा वापरला, मात्र सामान्य मतदार त्यांचा प्रयत्न हाणून पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ते एकावृत्तवाहिनीशी बोलत होते.
तसेच शिंदे म्हणाले, माझ्याविरोधात पवार कुटुंब होतं. मात्र आजपर्यंत त्यांनी या मतदारसंघासाठी काहीही केलं नाही. त्यांनी फक्त पैश्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला. मात्र त्यांचा प्रयत्न लोक हाणून पाडतील आणि माझा विजय निश्चित करतील,असेही ते म्हणाले.
दरम्यान, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. कारण या मतदारसंघात शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर त्यांच्या विरोधात राज्यमंत्री राम शिंदे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारणार याबाबत हे पाहणे उद्या औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1186953721172779008?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1186946533003939845?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

