मुंबई : म्हाडा भरती परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शनिवारी रात्री माहिती दिली. पेपर फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुण्यात तिघांना अटक झाली आहे. यावर भाजपाचे माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते(Ram Satpute) यांनी जितेंद्र आव्हाडांसह महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच आव्हाड यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा, अशी मागणीही केली आहे.
याबाबत राम सातपुते यांनी ट्विट करत म्हणाले, ‘या नालायक सरकारच डोकं ठिकाणावर आहे का.? सकाळी म्हाडाची परीक्षा आणि पहाटे परीक्षा रद्द करतात.निष्क्रिय,कर्मदरिद्री,वाचाळ आणि गचाळ सरकारचा निषेध.थोडी लाज शिल्लक असेल तर जितेंद्र आव्हाड यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा.’
या नालायक सरकारच डोकं ठिकाणावर आहे का.? सकाळी म्हाडाची परीक्षा आणि पहाटे परीक्षा रद्द करतात.निष्क्रिय,कर्मदरिद्री,वाचाळ आणि गचाळ सरकारचा निषेध.थोडी लाज शिल्लक असेल तर जितेंद्र आव्हाड यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा @Dev_Fadnavis @TV9Marathi @abpmajhatv @LoksattaLive
— Ram Satpute (@RamVSatpute) December 12, 2021
तसेच यापूर्वी केलेल्या ट्विटमध्ये सातपुते म्हणाले आहेत की,’सरकारने पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच वाटोळं करायचा संकल्प केला दिसतोय. आज होणारी म्हाडाची परीक्षा पुढे ढकलली. विद्यार्थ्यांचा किती तळतळाट घेणार हे सरकार. विद्यार्थी रेल्वे स्टेशनला जाऊन झोपले आहेत, कोणी बस, रेल्वे प्रवासात आहेत आणि परीक्षा रद्द.’ अशी टीका राम सातपुते यांनी केली आहे.
सरकारने पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच वाटोळं करायचा संकल्प केला दिसतोय.आज होणारी म्हाडा ची परीक्षा पुढे ढकलली.विद्यार्थ्यांचा किती तळतळाट घेणार हे सरकार.विद्यार्थी रेल्वे स्टेशन ला जाऊन झोपले आहेत,कोणी बस,रेल्वे प्रवासात आहेत आणि परीक्षा रद्द..????@Dev_Fadnavis pic.twitter.com/ZeSwFupTmZ
— Ram Satpute (@RamVSatpute) December 12, 2021
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ ट्विट केला असून ते म्हणाले की,‘सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळं आणि तांत्रिक अडचणीमुळं म्हाडाची आज होणारी परीक्षा आणि यापुढे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा जानेवारी महिन्यात होतील. ही माहिती एवढ्या रात्री यासाठी देतोय की विद्यार्थ्यांनी सेंटरवर जाऊ नये, त्यांना त्रास होऊ नये. परत एकदा क्षमा मागतो’, असेही आव्हाड म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- …तेव्हा राज्यकर्त्यांच्या मानसिकतेची दया आली- संजय राऊत
- महाराष्ट्र आणि बंगालमध्ये ‘ईडी’,’सीबीआय’सारख्या यंत्रणा करतात भाजपासाठी काम
- कॅ.अमरिंदर यांना बदलले नसते तर पंजाबमध्ये काँग्रेस संपली असती- राहुल गांधी
- आज होणारी म्हाडाची परीक्षा ढकलली पुढे; मध्यरात्री ट्विट करत जितेंद्र आव्हाडांनी दिली माहिती
- ‘सरकारने पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचं वाटोळ करण्याचा संकल्प केला’

